संदेशखली प्रकरणातील आरोपीला अटक करण्याचे न्यायालयाचे आदेश; सात दिवसांत अटक करण्याचे सरकारकडून जाहीर

या आदेशाचे तृणमूलने स्वागत केले, यापूर्वीच्या आदेशामुळे शाजहानला अटक करण्यासाठी सरकारचे हात बांधले गेले होते
संदेशखली प्रकरणातील आरोपीला अटक करण्याचे न्यायालयाचे आदेश; सात दिवसांत 
अटक करण्याचे सरकारकडून जाहीर
Published on

कोलकाता : संदेशखली येथे लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या प्रकरणातील आरोपी शाजहान शेख याला अटक करण्याचे आदेश सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यानंतर, सरकार आरोपींना पाठीशी घालत नाही, शेख याला सात दिवसांत अटक करण्यात येईल, असे तृणमूल सरकारने स्पष्ट केले.

आदिवासींच्या जमिनी बळकावणे आणि महिलांवर अत्याचार करणे असे शेख याच्यावर आरोप असून या प्रकरणात संक्तवसुली संचालनालय, सीबीआय, पोलीस निरीक्षक आणि राज्याच्या गृह सचिवाना पक्षकार करावे, असा आदेशही मुख्य न्यायाधीस टी. एस. शिवगनानम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. या आदेशाचे तृणमूलने स्वागत केले, यापूर्वीच्या आदेशामुळे शाजहानला अटक करण्यासाठी सरकारचे हात बांधले गेले होते, असे तृणमूलने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in