ज्ञानवापीप्रकरणी न्यायालयाने कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना पदावरून हटवले

ज्ञानवापीप्रकरणी न्यायालयाने कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना पदावरून हटवले

ज्ञानवापीप्रकरणी वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. विशेष अधिवक्ता विशाल सिंह यांनी आयोगाच्या कामकाजात असहकार केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता, तसेच त्यांनी एक खासगी कॅमेरामन ठेवला होता आणि माध्यमांना ते बाइट्स देत होते. हे कायद्याने चुकीचे आहे, असे सिंह यांनी निदर्शनास आणल्यानंतर अजय मिश्रा यांना कोर्ट कमिशनरच्या पदावरुन हटवण्यात आले.

कोर्ट कमिशनरची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे कोर्टाने नमूद केले. आता विशाल सिंह नवे कोर्ट कमिशनर असतील. दुसरीकडे, आयोगाचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यासाठी न्यायालयाने २ दिवसांची मुदत दिली आहे. आता १९ मे रोजी अहवाल दाखल करता येणार आहे.

भिंत पाडण्याबाबत आज सुनावणी

दरम्यान, आणखी दोन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. डीजीसी सिव्हिल आणि फिर्यादीच्या महिलांच्या आणखी दोन अर्जांवर उद्या म्हणजेच १८ मे रोजी सुनावणी होणार आहे. यामध्ये मशिदीच्या काही भिंती पाडून वझुखाना परिसर सील करून व्हिडिओग्राफी करण्याची मागणी झाली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in