हिमाचल HC ने डीजीपींना हटवले, SC ने परत बोलावले!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हे हे स्पष्ट झाले की, कुंडू राज्याचे पोलीस प्रमुख राहतील जोपर्यंत उच्च न्यायालय आपले निर्देश मागे घेण्याच्या त्यांच्या याचिकेवर निर्णय देत नाही.
हिमाचल HC ने डीजीपींना हटवले, SC ने परत बोलावले!

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या पोलीस महासंचालक पदावरून वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुंडू यांना हटविण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे कुंडू यांना दिलासा मिळाला आहे.

एका व्यावसायिकाने त्याच्या जीवाला त्याच्याच भागीदाराकडून धोका असल्याचा दावा केला होता, त्यावरून या व्यावसायिकावर दबाव आणल्याचा आरोप त्याने कुंडू यांच्यावर केल्यानंतर २६ डिसेंबर २०२३ रोजी हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुंडू यांची राज्याच्या आयुष विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्याचा आदेश हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी मंगळवारी जारी केला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हे स्पष्ट झाले की, कुंडू राज्याचे पोलीस प्रमुख राहतील जोपर्यंत उच्च न्यायालय आपले निर्देश मागे घेण्याच्या त्यांच्या याचिकेवर निर्णय देत नाही. सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश जे. बी. परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. आता गुरुवारी २६ डिसेंबर २०२३ रोजीचा आदेश मागे घेण्यासाठीच्या अर्जासह कार्यवाही केली जाईल. त्यासाठी तेव्हा याचिकाकर्त्याला (कुंडू) उच्च न्यायालयात जाण्‍याचे स्वातंत्र्य आहे, असे खंडपीठाने आदेश दिले.

खंडपीठाने सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयाला दोन आठवड्यांच्या कालावधीत परत बोलावण्याचा अर्ज निकाली काढण्याची विनंती करतो. परत बोलावण्याच्या अर्जावर आयपीएस अधिकाऱ्याच्या बाजूने निर्णय झाला, तर ते डीजीपी म्हणून कायम राहतील. कुंडूंच्या बदली अर्जाचा निकाल लागेपर्यंत, उच्च न्यायालयाच्या २६ डिसेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जाऊ नयेत. याचिका निकाली काढताना, सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की पक्षाचे सर्व हक्क आणि विवाद खुले ठेवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in