
नवी दिल्ली : एकीकडे देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून गेल्या १० दिवसांत देशभरात जवळपास ४० रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.
देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही जवळपास ७ हजारांच्या आसपास गेली आहे. दरदिवशी नवीन ३५० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन ८९ रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६१५ वर पोहोचली आहे. त्यात मुंबई ३२, पुण्यात २३ तर ठाण्यात ३ आणि नवी मुंबईत १ तसेच कल्याणमध्ये ४ रुग्ण आढळून आलेले आहेत.
केरळमध्ये सर्वाधिक २,०५३ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत केरळमध्ये ३२४ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि ५ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी कर्नाटकात दोन आणि केरळ, दिल्ली आणि झारखंडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळपाठोपाठ गुजरातमध्ये १,१०९ सक्रिय रुग्ण आहेत.