पतधोरण समितीची बैठक सुरू

सध्या रेपो रेट ६.५ टक्के आहे. रेपो दर ८ फेब्रुवारी २०२३ रोजी ०.२५ टक्का वाढल्यापासून वर्षभरापासून तो याच पातळीवर राहिला आहे.
पतधोरण समितीची बैठक सुरू
Published on

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक मंगळवारपासून (६ फेब्रुवारी) सुरू झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या बैठकीतील निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास ८ फेब्रुवारी रोजी सकाळी जाहीर केले जातील. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत सलग सहाव्यांदा व्याजदरात कोणताही बदल होणार नाही अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मासिक हप्ता कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही.

नुकताच अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर झाल्यानंतर आरबीआयने रेपो दर कायम राखणे अपेक्षित आहे. आरबीआय या बैठकीत रेपो दरात कोणतेही बदल करण्याची शक्यता नाही. कारण किरकोळ महागाई अजूनही सरकारने निश्चित केलेल्या पातळीच्या जवळ आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सध्या रेपो रेट ६.५ टक्के आहे. रेपो दर ८ फेब्रुवारी २०२३ रोजी ०.२५ टक्का वाढल्यापासून वर्षभरापासून तो याच पातळीवर राहिला आहे. किरकोळ चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या लक्ष्याजवळ आणण्यासाठी व्याजदरात कपात होण्याची शक्यता नाही. यापूर्वी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने देखील व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नाही. तेथेही व्याजदर ५.२५ ते ५.५ टक्के ठेवण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in