सुरेश रैनाच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; युपी पोलिसांची कारवाई

माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या ३ नातेवाईकांची २०२०मध्ये हत्या करण्यात आली होती, याप्रकरणी प्रमुख आरोपीचा एन्काउंटर युपी पोलिसांनी केला
सुरेश रैनाच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; युपी पोलिसांची कारवाई

सध्या उत्तर प्रदेश पोलीस राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी मोठ्या कारवाया करत आहेत. अशामध्ये नुकतेच त्यांनी कुख्यात गुंड राशिदचा एन्काउंटर केला. मुजफ्फरपूरमधील शाहपूरमध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांना हे यश मिळाले. राशिदवर तब्बल १५ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. या एन्काउंटरदरम्यान एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली.

मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनी सांगितले की, "आरोपी राशिदवर १४ ते १५ गुन्ह्यांची नोंद होती. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या ३ नातेवाईकांच्या हत्या प्रकरणामध्ये तो मुख्य आरोपी होता. त्याने २०२० मध्ये पठाणकोटमध्ये सुरेश रैनाचे काका, काकी आणि चुलत भावाची हत्या केली होती. आम्हाला माहिती मिळाली होती की, काही गुंड शाहपूर परिसरामध्ये फिरत आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, शाहपूर पोलीस आणि एसएसओने परिसरात शोधमोहीम सुरू केली. यावेळी केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबारात राशिद ठार झाला. तसेच, त्याच्यासोबत असलेला साथीदार पळून गेला."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in