ही तर गरीबांची लूट: चिदंबरम ; उत्तर प्रदेशातील पोलीसभरती परीक्षेसंबंधात टीका

प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपानंतर उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा रद्द केली आणि सहा महिन्यांत पुन्हा चाचणी घेण्याचे आदेश दिले.
ही तर गरीबांची लूट: चिदंबरम ; उत्तर प्रदेशातील पोलीसभरती परीक्षेसंबंधात टीका
Published on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये नुकतीच झालेली पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी भाजपवर टीका केली. या प्रकारामुळे गरीबांची लूट होत आहे आणि त्यांना दीर्घकाळ बेरोजगार ठेवले जात आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले.

प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपानंतर उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा रद्द केली आणि सहा महिन्यांत पुन्हा चाचणी घेण्याचे आदेश दिले. राज्य सरकारने या आरोपांची विशेष टास्क फोर्स (एसटीएफ) मार्फत चौकशी करण्याची घोषणाही केली. या संबंधात एक्सवरील एका पोस्टमध्ये चिदंबरम म्हणआले की, उत्तर प्रदेशमध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या ६०४०० पदांसाठी निवडीसाठी ४३ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यांनी गर्दीने भरलेल्या बस आणि ट्रेनमध्ये लांबचा प्रवास केला, पैसे खर्च केले आणि अनेक अडचणींना तोंड दिले.

ही परीक्षा रद्द करण्यात आली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार असलेल्या 'सर्वोत्तम-शासित राज्यात' हे होत असून हे सुशासन आहे का? असा सवाल करीत चिदंबरम यांनी सांगितले की, हे प्रशासन गरिबांनी त्यांच्या कष्टाने कमावलेले थोडे पैसे लुटत आहे आणि त्यांना दीर्घकाळ गरीब आणि बेरोजगार ठेवत आहे.

logo
marathi.freepressjournal.in