सीआरपीएफ जवानांच्या गाडीला अपघात ; गाडी सिंध नदीत कोसळल्याने आठ जवान जखमी

सीआरपीएफच्या जवानांनी भरलेली गाडी बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात असताना हा अपघात घडला
सीआरपीएफ जवानांच्या गाडीला अपघात ;  गाडी सिंध नदीत कोसळल्याने आठ जवान जखमी

जम्मू - काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली असून जवानांना घेऊन जाणारी ही गाडली सिंध नदीत कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात रविवारी (१६ जुलै) ही घटना घडली आहे. सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन सिंध नदीत कोसळल्याने आठ जवान जखमी झाले आहे. यानंतर तात्काळ जखमी जवानांना बाहेर काढत बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आलं. पीटीआय वृत्त संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

सीआरपीएफच्या जवानांनी भरलेली गाडी बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात असताना हा अपघात घडला. रविवारी सकाळी निलगिरी हेलिपॅडजवळ जवानांना घेऊन जाणारं वाहन सिंध नदीत कोसळल्यानं अपघात झाला. रविवारी सकाळच्या सुमरारस हा अपघात घडला. या गाडीतून सीआरपीएफचे जवान अमरनाथ गुहेकडे जात होते.

सध्या पवित्र अमनाथ यात्रा सुरु आहे. यामुळे यात्रेवरील दहशतवादाचा धोका पाहता प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफच्या जवानांची फौज तैन्यात केली आहे. यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी ही पाऊलं उचलली गेली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in