सहा महिन्यांच्या नीचांकावरुन कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ

जागतिक मंदीच्या भीतीने गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्रेंट क्रूड दर ९४.९१ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल होता.
सहा महिन्यांच्या नीचांकावरुन कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचा दर सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवरुन पुन्हा वधारलाआहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून वाढ होत नसल्याने भारतीय तेल कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी त्यांचा तोटा कायम आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

जागतिक मंदीच्या भीतीने गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्रेंट क्रूड दर ९४.९१ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल होता. तर बुधवारी हा दर ९१.५१ अमेरिकन डॉलर्स होता. सध्याचे तेल बाजारातील दर हे भारतीय कंपन्यांना दिलासादायक आहेत. कारण भारत हा एकूण तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो.

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेल दरातील घसरणीमुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसारखा किरकोळ इंधनाचा देशात पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना लाभदायक ठरले आहे. तथापि, डिझेलमध्ये तोटा अद्यापही होत असल्याचे यासंदर्भातील माहिती असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in