स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी भारतीय शेअर बाजार बंद आहे. पण क्रिप्टोकरन्सी मार्केट सात दिवस आणि चोवीस तास चालते. सोमवारी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ९:३५ पर्यंत जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ०.३६ टक्क्यानी वाढून १.१८ ट्रिलियन डॉलर झाले आहे. बिटकॉइन आणि इथरियममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तेजी आहे.
कॉईन मार्केटकॅपच्या माहितीनुसार बिटकॉइन १.११ टक्क्यांच्या वाढीसह २४,८५८.१९ डॉलरवर आहे. ते २५ हजार डॉलर्सच्या अगदी जवळ पोहोचले आहे. गेल्या ७ दिवसांत त्यात ६.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नाणे इथरियमची किंमत गेल्या २४ तासात ०.०८ टक्क्यांनी वाढून १,९८५.०३ वर पोहोचली आहे. गेल्या ७ दिवसांत त्यामध्ये १६.०८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व ४०.२ टक्के आहे, तर इथरियमचे २०.५ टक्के आहे. बिटकॉइनचे मार्केट कॅप ४७५.६२ बिलियन डॉलर आहे, तर इथरियमचे मार्केट कॅप २४२.२९ बिलियन डॉलर आहे. इथरियमचे मार्केट कॅपही उत्तम वाढत आहे.