CSDS च्या अडचणी वाढणार; ICSSR बजावणार कारणे दाखवा नोटीस

‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ने (सीएसडीएस) अलीकडेच महाराष्ट्राची निवडणूक आकडेवारी सादर केली होती. सीएसडीएसमधील लोकनीतीचे सह-संचालक संजय कुमार यांनी महाराष्ट्राची आकडेवारी दाखवणारी पोस्ट टाकल्यानंतर ती दोन दिवसांनी डिलीट केली आणि चुकीच्या आकडेवारीबद्दल माफी मागितली. त्यामुळे सीएसडीएसच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावली आहे.
CSDS च्या अडचणी वाढणार; ICSSR बजावणार कारणे दाखवा नोटीस
Published on

नवी दिल्ली : ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ने (सीएसडीएस) अलीकडेच महाराष्ट्राची निवडणूक आकडेवारी सादर केली होती. सीएसडीएसमधील लोकनीतीचे सह-संचालक संजय कुमार यांनी महाराष्ट्राची आकडेवारी दाखवणारी पोस्ट टाकल्यानंतर ती दोन दिवसांनी डिलीट केली आणि चुकीच्या आकडेवारीबद्दल माफी मागितली. त्यामुळे सीएसडीएसच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावली आहे. कारण ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’ (आयसीएसएसआर) त्यांना निवडणूक डेटामध्ये फेरफार करून निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.

सीएसडीएसने डेटामध्ये केलेल्या कथित फेरफार प्रकरणाची आणि निवडणूक आयोगाच्या अखंडतेला हानी पोहोचवण्यासाठी एक कथा तयार करण्याच्या प्रयत्नाची दखल आयसीएसएसआरने घेतली आहे. सीएसडीएसमध्ये एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने एक सार्वजनिक विधान केले होते, जे त्यांनी नंतर मागे घेतले, हे आमच्या लक्षात आले आहे, असेही आयसीएसएसआरने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकांशी संबंधित डेटाच्या विश्लेषणात अनियमितता असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. हे आयसीएसएसआरच्या अनुदान नियमांचे उल्लंघन आहे. आयसीएसएसआर आता सीएसडीएसला कारणे दाखवा नोटीस बजावेल. निवडणूक विश्लेषक आणि सीएसडीएसचे प्राध्यापक संजय कुमार यांनी गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित दोन विधानसभा जागांचा मतदार डेटा ‘एक्स’वरील पोस्टमध्ये शेअर केला होता.

प्रसिद्ध राजकीय विश्लेषक संजय कुमार यांनी ‘एक्स’वर नाशिक पश्चिम, हिंगणा, रामटेक व देवळाली येथील मतदारांच्या संख्येत दोन २०२४ च्या निवडणुकांदरम्यान मोठी तफावत दर्शविणारे आकडे पोस्ट केल्यानंतर हा वाद सुरू झाला. कुमार यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघात ३.२८ लाख मतदार होते, त्यांची संख्या विधानसभा निवडणुकीत १.५५ लाखाने (४७.३८%) वाढून, ती ४.८३ लाख झाली.

हिंगणा मतदारसंघातही मतदारांची संख्या ३.१५ लाखांवरून ४.५० लाखांपर्यंत वाढली. म्हणजेच त्यात १.३६ लाख (४३.०८%) मतदारांची भर पडली. इतर दोन मतदारसंघांमध्ये मतदारांच्या संख्येत जवळपास ४० टक्क्यांनी घट झाली. रामटेक मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ४.६६ लाख मतदार होते, त्यात विधानसभा निवडणुकीत १.८० लाखांची घट झाली.

logo
marathi.freepressjournal.in