बिहारमधील नितिश सरकारने नुकतीच राज्यातील जातनिहाय जनगणनेतील आकडेवारी जाहीर केली आहे. यानंतर नितीश सरकारवर अनेकांनी टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाने नितीश यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. बिहार सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, न्यायालयाने या प्रकरणार बोलण्यास नकार दिला आहे.
अशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. बिहारनंतर चार राज्यांमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. ही चारही राज्य ही काँग्रेसशासित आहेत. काँग्रेस वर्किग कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यानंतर ही माहिती दिली आहे.
या राज्यात होणार जातीनिहाय जनगणना
राजस्थान, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि छक्तीसगढमध्ये जातीय जनगणना केली जाणार आहे. बिहार राज्याने केलेल्या जनगणनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बिहार राज्याच्या जातीनिहाय जनगणनेवर बंधी घालणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. यानंतर काँग्रेसने आपलं सरकार असलेल्या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली.
बिहारमध्ये नितीश सरकारने देशात पहिल्यांदा जातनियाह जनगणना करत सर्वांना धक्का दिली. गांधी जयंतीच्या दिवशी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. यानुसार बिहारमध्ये ८१.९९ टक्के हिंदू आहेत. तर मुस्लिम धर्मियांची संख्या ही १७.७ एवढी आहे. बिहारमध्ये शीख, बौद्ध आणि जैन धर्मीयांची संख्या १ टक्क्याहून कमी आहे. तर बिहार राज्यात २१४६ लोक निधर्मी आहेत.
वर्गवारी नुसार बिहारची लोकसंख्या
सर्वसाधारण - १५.२२%
मागास - २७.१२ %
ओबीसी - ३६.१ %
अनुसुतीच जाती - १९६५%
अनुसुचीत जमाती - १.६८%