बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ; मुसळधार पावसाचा इशारा

या चक्रीवादळामुळे भारत, बांगलादेश आणि म्यानमारला सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ;  मुसळधार पावसाचा इशारा
Published on

कोलकाता : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्माण झाले असून, त्याला 'दाना' असे नाव देण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून ते दक्षिण भारतापर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच हे चक्रीवादळ २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर आदळू शकते.

या चक्रीवादळामुळे भारत, बांगलादेश आणि म्यानमारला सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या वादळाच्या परिणामामुळे पुढील दोन ते तीन दिवस तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि ओदिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर अजूनही पावसाचे सावट कायम आहे.

logo
marathi.freepressjournal.in