सध्या संपूर्ण देशात अवाकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. देशातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर आता देशभरात देखील पाऊसाची चाऊल लागत आहे. फक्त पाऊसच नाही तर आता चक्रीवादळाने देखील तांडव सुरु केल्याचं चित्र आहे. अशातच आता 'मिचॉंग चक्रीवादळा'चं गांभीर्य लक्षात घेऊन चेन्नई विमानतळावर उतरणारे 33 विमाने बंगळुरू विमानतळाकडे परत वळवण्यात आले आहेत.
या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे. त्यामुळे तिथे आता जास्त खबरदारी घेण्यात आली आहे. या 33 विमानसेवांमध्ये इंडिगो, स्पाईसजेट, इतिहाद, गल्फ एअर यांचा समावेश आहे. तर चेन्नईला जे विमान येतं होते त्यामधील काही विमान रद्द करण्यात आली आहेत.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकारच्या सतत संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितलं आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने तब्बल 144 गाड्या रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मिचाँग चक्री वादळाच्या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे.
मिचॉंग चक्रीवादळामुळे येणाऱ्या 24 तासांत महाराष्ट्रात देखील पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडू शकतो. येणाऱ्या 24 तासांत महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.