तामिळनाडूवर मिचॉंग चक्रीवादळाचं संकट; मुख्यमंत्री स्टॅलिय यांच्याकडून खबरदारीच्या उपाययोजना, महाराष्ट्रातही अवकाळीची शक्यता

पावसाच्या स्थितीनुसार खासगी शाळा आणि महाविद्यालयांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
तामिळनाडूवर मिचॉंग चक्रीवादळाचं संकट; मुख्यमंत्री स्टॅलिय यांच्याकडून खबरदारीच्या उपाययोजना, महाराष्ट्रातही अवकाळीची शक्यता

मिचॉंग चक्रीवादळ देशभरात अवकाळी पावसाचे सावट घेऊन आले आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याने विविध राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. या चक्रीवादळाचा तामिळनाडूला जास्त धोका असल्याचं बोललं जात आहे. तामिळनाडूनत सतत पडणारा पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता, चेन्नई जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सरकारी शाळा २ आणि ३ डिसेंबर रोजी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आव्हानांपासून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसाच्या स्थितीनुसार खासगी शाळा आणि महाविद्यालयांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुसऱ्या बाजूला केवळ तामिळनाडूच नव्हे तर देशभरातील इतर राज्यांमध्येही पर्जन्यपृष्टी होईल, अंदा व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा तामिळनाडूला बसण्याची शक्यता आहे. यामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात सावधगिरी आणि निर्वासन उपाय योजले आहेत. येणाऱ्या चक्रीवादळामुळे नागापट्टिनम जिल्ह्यातील वेलंकन्नी किनारपट्टी भागातील समुद्र नेहमीपेक्षा जास्त उग्र असल्याचं नोंदवलं गेले आहे.

ईशान्य मान्सूनची तीव्रता वाढत असताना तामिळनाडूमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. नागापट्टिनम बंदरासह पाच बंदरांवर 'सायक्लोन वॉर्निंग केज -नं-१' फडकवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना संवेदनशील भाग रिकामे करण्यासह आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मदत शिबिरांमध्ये सतत अन्न, वीज आणि आवश्यक पुरवठा करण्यावर भर दिला आहे. पडलेली झाडे काढून टाकणे सरकारी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन कक्षांची उपलब्धता आणि अन्न केंद्रांची तयारी या सावधगिरीच्या उपायांपैकी एक राज्य अधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या आढावा बैठकीत ठळकपणे सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in