‘नोरू’ चक्रीवादळाचा भारताला फटका

पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
‘नोरू’ चक्रीवादळाचा भारताला फटका

दक्षिण चीन समुद्रातील ‘नोरू’ वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे आर्द्रतेत वाढ झाल्याने सध्या भारताच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. हा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात पाऊस पडेल. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७-८ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील कुमाऊं आणि गढवाल भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह २० राज्यांना यलो अलर्ट

हवामान खात्याने देशातील २० राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. या राज्यांत मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in