सितरंग चक्रीवादळाचे संकट

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या वादळाला थायलंडने ‘सितरंग’ हे नाव दिले आहे.
सितरंग चक्रीवादळाचे संकट

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि मान्सून संपताना बंगालच्या उपसागरात वादळे धडकण्याची परिस्थिती देशाला नवीन नाही. आता बंगालच्या उपसागरावरील खोल तथा कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित झाले असून, सोमवारी हे वादळ बांगलादेश किनारपट्टीकडे सरकत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या वादळाला थायलंडने ‘सितरंग’ हे नाव दिले आहे.

सोमवारी याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याने भारतीय किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी हे वादळ बांगलादेशमधील टिकोना बेट आणि सनद्वीप यांच्यामध्ये धडकू शकते. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातच राहणार असून, भारतीय किनारपट्ट्यांवर धडकणार नाही, असा अंदाज आहे. मात्र यामुळे ओदिशा आणि बंगालच्या किनारपट्ट्यांवर या चक्रीवादळाचा प्रभाव पडू शकतो. कोलकाता, हावडा आणि हुबळीत सोमवारी आणि मंगळवारी रिमझिम पाऊस पडू शकतो.

सितरंग म्हणजे त्सुनामी

बंगालच्या उपसागरात गेल्या ५० वर्षांत येणारे हे आतापर्यंतचे सुमारे १७०वे चक्रीवादळ आहे. २०२०पासून चक्रीवादळाला नावे ठेवण्यात येत असून, यापूर्वी आसानी, तौक्ते अशी नावे चक्रीवादळाला देण्यात आली आहेत. या वादळाला थायलंड देशाने सितरंग किंवा सित्रांग हे नाव दिले असून, थाय भाषेत याचा अर्थ त्सुनामी असा होतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in