Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांच्यावर उद्या (मंगळवारी) अंत्यसंस्कार

अहमदाबादहून मुंबईला येत असताना पालघरमधील चारोटी जवळ मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला अपघात झाला
Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांच्यावर उद्या (मंगळवारी) अंत्यसंस्कार

टाटा सन्स समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे पालघरमध्ये अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायरस मिस्त्री यांच्यावर उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान, मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना आदेश दिले आहेत. अहमदाबादहून मुंबईला येत असताना पालघरमधील चारोटी जवळ मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला अपघात झाला. दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अतिवेगाने हा अपघात झाल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

पालघरमधील चारोटी येथील अपघातातील चालक आणि सायरस मिस्त्री या दोघांचेही मृतदेह रात्री मुंबईत आणण्यात आले. पहाटे 2.30 वाजता त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस मिस्त्री यांच्यावर उद्या (मंगळवारी) अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत पार्थिव जे. जे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in