D A Hike : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीची भेट

केंद्र सरकारने लागू केलेल्या महागाई भत्त्यात वाढ जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी असेल
D A Hike : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीची भेट
Published on

केंद्र सरकारने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (DA Hike) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के झाला आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या महागाई भत्त्यात वाढ जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी असेल. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता ३८ टक्के महागाई भत्ता मिळेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार ही वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो. मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता महागाई भत्ता ३८ टक्के केला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारात वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. मागील तीन महिन्यांचा महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in