
नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली. त्याचबरोबर पेंशनर्ससाठी महागाई सवलत (डीआर) मध्येही ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के झाला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल.
कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासह जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी मिळेल. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लक्षणीय पगारवाढ झाली आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लागू असेल. या वर्षी महागाई भत्त्यात झालेली ही दुसरी वाढ आहे. मूळ पगार ३० हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा अतिरिक्त ९०० मिळतील, तर ४० हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त १२०० मिळतील. महत्वाचे म्हणजे, तीन महिन्यांच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अतिशय उत्साहात जाणार आहे.
सीपीआय-आयडब्ल्यू डेटा
ही वाढ सातव्या वेतन आयोगानुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांवर, पेंशनर्स आणि कुटुंब पेंशनर्सवर लागू होईल. दरवर्षी दोनदा महागाई भत्त्यामध्ये वाढकेली जाते ज्यामध्ये औद्योगिक कामगारांसाठी सीपीआय-आयडब्ल्यू ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंण्डेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्सचे आकडे आधार घेतले जातात आकडे आधार घेतले जातात. विशेष म्हणजे, पुढील वर्षी, जानेवारी २०२६ पासून ८वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ अपेक्षित आहे.