Viral : 'इंग्लिश मीडियम में पैसा बर्बाद किया मेरा...', मुलीची चूक झाली; टोमणा मारत वडिलांनीच केले ट्रोल

बाप-लेकीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल...
Viral : 'इंग्लिश मीडियम में पैसा बर्बाद किया मेरा...', मुलीची चूक झाली; टोमणा मारत वडिलांनीच केले ट्रोल

आपण सोशल मीडियावर अनेकदा अशा पोस्ट पाहतो ज्या खळखळून हसवतात. त्यामुळे थोडा वेळ का होईना आपण रिफ्रेश होतो. अलीकडेच एका तरुणीने तिच्या वडिलांसोबतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला, जो खरोखर मजेदार आहे. बाप-लेकीच्या गप्पांचा हा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अन्वी नावाच्या मुलीने हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. खरंतर वडिलांनी तिला, 40k Deposited in your account (40 हजार रुपये तुझ्या खात्यात जमा केले) असा मेसेज पाठवला होता. त्याला उत्तर म्हणून मुलीने मिळालेऐवजी चक्क Found (सापडले) असा मेसेज पाठवला. मग काय, हिच संधी साधत वडिलांनी मुलीला टोमणा मारत ट्रोल केले. कारण, पैसे मिळाले (Received) असे उत्तर तिच्याकडून अपेक्षित होते. मुलीचे इंग्रजी सुधारत वडिलांनी Received असे लिहून पाठवले. पुढे, 'इंग्लिश मीडियम में पैसा बरबाद किया मेरा' असे लिहून मनसोक्त हसण्याचे इमोजीही जोडले. त्यानंतर, अन्वीने याचा स्क्रीनशॉट X वर पोस्ट केला आणि 'माझ्या वडिलांना काय झालंय' असा सवाल विचारला होता. तिची पोस्ट आता व्हायरल झाली असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

या पोस्टवर लोक खूप कमेंट करीत आहेत. तुझे वडील खूपच मजेशीर आहेत असे एकाने लिहिले. तर, अंकल सबसे कूल है असे अजून एकाने म्हटले. वडिलांनी तुझ्या शाळेसाठी खूपच फी भरलीये वाटते असेही एकाने लिहिले. या पोस्टला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in