पाणी पिण्यावरून दलित विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू

पाणी पिण्यावरून दलित विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू

दलित विद्यार्थी इंद्र कुमार याला त्याच्या शाळेतील शिक्षकाने २० जुलैला पिण्याच्या पाण्याच्या मटक्याला हात लावला

राजस्थानातील जालोरमध्ये एका दलित विद्यार्थ्याला पिण्याच्या पाण्याच्या मटक्याला हात लावल्यामुळे त्याच्या शाळेतील शिक्षकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी विरोधकांनी गेहलोत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला असताना आता काँग्रेसचे आमदार पानाचंद मेघवाल यांनी या प्रकरणामुळे आपल्याला धक्का बसल्याचे सांगत आपल्या आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे पाठवून घरचा आहेर दिला आहे.

दलित विद्यार्थी इंद्र कुमार याला त्याच्या शाळेतील शिक्षकाने २० जुलैला पिण्याच्या पाण्याच्या मटक्याला हात लावल्याबद्दल बेदम मारहाण केली होती. त्याच्यावर गुजरातमधील अहमदाबाद येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी शिक्षक चैल सिंग (४०) याला अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारने मृताच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, राजस्थान राज्य मानवी हक्क आयोगाने या घटनेची स्वत:हून दखल घेतली असून, याप्रकरणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना नोटीस जारी केली आहे. आयोगाने त्यांना याबाबतचा अहवाल २६ ऑगस्टपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.

मारेकऱ्यांना फाशी द्या

जालोरमधील अवघ्या ९ वर्षांच्या कोवळ्या दलित विद्यार्थ्यांची केवळ त्याने सवर्ण शिक्षकांसाठी राखून ठेवलेल्या माठातून पाणी पिल्याच्या रागातून झालेली निर्घृण हत्या हा मानवतेला लागलेला कलंक आहे. या अमानुष जातीयवादाचा आम्ही तीव्र निषेध करीत असून मारेकऱ्यांना फाशीची करावी.

- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in