अमेरिकन वैज्ञानिकांनी बनवला खतरनाक कोरोना

चीनच्या वुहान लॅबमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या मूळ विषाणूत ओमायक्रॉनचे स्पाईक प्रोटीन मिसळवले.
अमेरिकन वैज्ञानिकांनी बनवला खतरनाक कोरोना
Published on

गेली दोन वर्षे जग कोरोनाच्या जाळ्यात अडकलेले असतानाच अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कोरोनाचा खतरनाक विषाणू बनवला आहे. याचे प्रयोग उंदरावर करण्यात आले आहेत. या कोरोनाचा मृत्यूदर ८० टक्के आहे. हे संशोधन सार्वजनिक झाल्याने वाद निर्माण झाला असून अमेरिकेच्या आरोग्य खात्याकडून याची चौकशी सुरू झाली आहे. या प्रयोगशाळेत काही चूक झाल्यास संपूर्ण जगात महासाथ पसरू शकते, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

चीनच्या वुहान लॅबमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या मूळ विषाणूत ओमायक्रॉनचे स्पाईक प्रोटीन मिसळवले. प्रयोगशाळेत बनवलेल्या विषाणूपेक्षा ओमायक्रॉन हा कमी घातक आढळला. वैज्ञानिकांनी या विषाणूचे प्रयोग उंदरावर केले. यात ८० टक्के उंदरांचा मृत्यू झाला. यानंतर वाद निर्माण झाला. अमेरिकेच्या आरोग्य संस्थेने सांगितले की, वैज्ञानिकांनी यासाठी सरकारचे पैसे खर्च केले आहेत. खतरनाक विषाणू बनवण्यासाठी लागणाऱ्या सरकारी मार्गदर्शक तत्वांचे पालन गरजेचे होते की नाही याचा शोध घेतला जात आहे. तर बोस्टन विद्यापीठाने सांगितले की, आरोग्य संस्थेला यामध्ये दखल देण्याची काहीच गरज नाही. कारण संशोधनासाठी सरकार थेट निधी देत नाही. त्यांच्या निधीचा वापर तंत्रज्ञान व उपकरणांसाठी केला जातो. बोस्टन विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, वैज्ञानिक व स्थानिक जैविक सुरक्षा समितीने या शोधाचे समीक्षण केले आहे. बोस्टन सार्वजनिक आरोग्य समितीने या शोधाला मंजुरी दिली. सर्व प्रोटोकॉल पाळूनच हे संशोधन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in