Gujarat Assembly Polls : अखेर गुजरात निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु ; निवडणूक आयोगाने केली तारीख जाहीर

निवडणुकीच्या तारखा जाहीर (Gujarat Assembly Polls) करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
Gujarat Assembly Polls : अखेर गुजरात निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु ; निवडणूक आयोगाने केली तारीख जाहीर

अखेर गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Polls) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी १८२ जागांवर मतदान होणार असून दोन टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. तर, मतमोजणी ही ८ डिसेंबर होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.

निवडणुकीच्या (Gujarat Assembly Polls) तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यंदाच्या निवडणुकीत ४.९ कोटी मतदार असून ४.६ लाख युवा प्रथमच मतदान करणार आहेत. दिव्यांगासाठी १८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ९. ८९ लाख वृद्ध नागरिक मतदान करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

एकाच मतदारासाठी बनवणार मतदान केंद्र

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, गीर जंगलातील बनेज गावामध्ये राहणारे भरतदास दर्शनदास यांच्यासाठी एक मतदान केंद्र बनवले जाणार आहे. या एकाच मतदारासाठी १५ जणांचे एक पथक तिकडे जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in