
देशाची राजधानी दिल्लीमधून अनेकदा बलात्कार, छेडछाडीच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशामध्ये दिल्लीतील महिलेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकतेच दिल्लीच्या महिला अध्यक्ष्या स्वाती मालिवाल यांच्यासोबतही छेडछाडीची घटना समोर आली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली. एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीने गुरुवारी पहाटे एम्सजवळ मालिवाल यांची छेड काढली. त्यांच्यापासून अगदी थोड्याच अंतरावर महिला आयोगाची टीम होती. त्याला अटक करण्यात आली आहे.
स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले की, "दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे? हे पाहण्यासाठी मी गेले होते. तेव्हा एका मद्यधुंद गाडी चालकाने माझ्याशी छेडछाड केली. मी त्याला पकडले, त्यावेळी त्याने गाडीच्या खिडकीमध्ये हा अडकवला आणि मला ओढत नेले. देवाने जीव वाचवला. जर दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थितीची कल्पना करा." असे ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. राजधानीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती तपासण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या असताना महिला अध्यक्षांनाच छेडछाडीच्या घटनेला सामोरे जावे लागले. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.