मणिपूरमध्ये जवानाचा मृतदेह हस्तगत

कर्तव्यावर असताना उपनिरीक्षक ओन्खोमांग हाओकीप यांचा मृत्यू झाला
मणिपूरमध्ये जवानाचा मृतदेह हस्तगत

इंफाळ : मणिपूरमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी घरातून अपहरण केलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाचा मृतदेह रविवारी पहाटे सापडला. लष्कराच्या डिफेन्स सिक्युरिटी कोअर प्लाटूनच्या शिपाई सेर्टो थांगथांग कोम यांचा मृतदेह मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खुनिंगथेक गावात सापडला. हा सैनिक तरुंग येथील रहिवासी होता आणि अपहरणाच्या वेळी तो रजेवर होता. सेर्टो थांगथांग कोम सुटीवर असताना ३ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे बंदुकीच्या धाकाने अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या केली. या जवानाच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

वांशिक हिंसाचारग्रस्त राज्यातील चुडाचंदपूर जिल्ह्यात मणिपूर पोलिसांच्या एका उपनिरीक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या काही दिवसानंतर भारतीय लष्कराच्या एका जवानाची टार्गेट हत्या करण्यात आली आहे. एन. चिंगफेई गावात कर्तव्यावर असताना उपनिरीक्षक ओन्खोमांग हाओकीप यांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in