आयटीआर भरण्याची अंतिम मुदत संपली; आयकर रिटर्न भरण्यापूर्वी दंड भरावा लागणार

सरकार शेवटच्या क्षणी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवेल अशी अटकळ होती
आयटीआर भरण्याची अंतिम मुदत संपली; आयकर रिटर्न भरण्यापूर्वी दंड भरावा लागणार

आयटीआर भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती, जी आता संपली आहे. आता अनेकांनी आयटीआर दाखल केलेला नाही. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सुमारे साडेपाच कोटी लोकांनी आयटीआर भरले आहेत, परंतु तरीही मोठ्या संख्येने लोकांनी रिटर्न भरलेले नाहीत. अशा परिस्थितीत ज्यांनी आतापर्यंत रिटर्न भरले नाहीत त्यांना आता आयकर रिटर्न भरण्यापूर्वी दंड भरावा लागेल, त्यानंतरच ते रिटर्न भरू शकतील.

सरकार शेवटच्या क्षणी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवेल अशी अटकळ होती, परंतु सरकारने आधीच सूचित केल्याप्रमाणे, रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली नाही.

बऱ्याच लोकांनी ई-फायलिंग वेबसाइटमधील त्रुटींबद्दल तक्रार केली आणि आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी केली होती. परंतु सरकारने त्यांना स्पष्टपणे नकार दिला की यावेळी आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढवण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. मुदतवाढ मिळण्याची वाट पाहत ज्यांनी अद्याप रिटर्न भरले नाहीत, त्यांना आता दंडासह रिटर्न ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत भरता येईल. आता १००० ते ५००० रुपये दंड भरावा लागेल. वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास आयकर रिटर्न भरले नाही, तर ३१ डिसेंबरपर्यंत १ हजार रुपये दंड भरून आयटीआर भरू शकता. वार्षिक उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा (रु. २.५ लाख) कमी असल्यास एक रुपयाही दंड भरावा लागणार नाही.

३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरला

नाही तर परतावा कसा मिळेल?

आयकर विभागाकडून रिफंड घ्यायचा असेल आणि तुम्ही ३१ जुलैपर्यंत रिटर्न भरला नसेल, तर तुम्ही ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत दंडासह रिटर्न भरून तुमच्या रिफंडचा दावा करू शकता. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत तुमचे रिटर्न भरले नसले तरीही तुम्हाला रिफंड मिळू शकेल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्राच्या आयकर आयुक्तांकडे अपील करावे लागेल. तुमचे रिटर्न न भरण्याचे कारण योग्य असल्यास ते तुम्हाला त्यानंतरही रिटर्न भरण्याची परवानगी देऊ शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in