प्रिय वायनाडची जनता, तुम्ही माझे कुटुंब; राहुल गांधी यांचे पत्र

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे यंदा दोन मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघ कायम ठेवला असून वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे यंदा दोन मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघ कायम ठेवला असून वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. वायनाडच्या जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल राहुल गांधी यांनी त्यांनी आभार मानले. तुम्ही माझे कुटुंबीय आहोत, असे भावनिक पत्रच वायनाडवासीयांना दिला आहे.

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच या दोन्ही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. दरम्यान, नियमानुसार एका मतदारसंघातून राजीनामा देणं आवश्यक असल्याने राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला एक भावूक पत्र लिहिलं आहे. तसेच तुम्ही माझ्यासाठी घर आणि कुटुंब आहात, असे उदगार राहुल गांधी या पत्रातून काझले आहेत.

गांधी पत्रात लिहिले की, वायनाडच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय, त्यासाठी मी तुमचे कसे आभार मानू हे मला कळत नाही आहे. मला सर्वाधिक गरज असताना तुम्ही मला प्रेम आणि संरक्षण दिलं. तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात. मी तुमच्यासाठी नेहमी उपस्थित राहीन. तुमचे खूप खूप आभार.

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये वायनाडमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२४ मध्येही राहुल गांधी यांनी वायनाडसोबतच रायबरेलीतून निवडणूक लढवली.

तसेच दोन्ही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. आता त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in