येडियुरप्पा यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा मृत्यू

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर आपल्या १७ वर्षीय मुलीचा लैंगिक शोषण केल्याचा आरोप करणाऱ्या ५४ वर्षीय महिलेचा येथे मृत्यू झाला.
येडियुरप्पा यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा मृत्यू

बंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर आपल्या १७ वर्षीय मुलीचा लैंगिक शोषण केल्याचा आरोप करणाऱ्या ५४ वर्षीय महिलेचा येथे मृत्यू झाला. फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यामुळे येथील खासगी रुग्णालयात ती अनेक दिवस उपचार घेत होती, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.

या महिलेने मार्चमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आरोप केला होता की, येडियुरप्पा यांनी २ फेब्रुवारीला एका बैठकीदरम्यान तिच्या मुलीचे लैंगिक शोषण केले. आरोप फेटाळून लावत येडियुरप्पा यांनी सांगितले होते की, ते हे प्रकरण कायदेशीररीत्या लढतील. हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in