नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन

नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी याबाबत नवी दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. राणा दाम्पत्याने गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीसा मुद्दा लावून धरला होता. नवनीत राणा यांच्या फोनवर गेल्या दोन-तीन दिवसांत आठ ते नऊ वेळा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव कादरी असल्याचे सांगितल्याचा दावा राणा दामप्त्याने केला आहे.

सार्वजनिकपणे हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारू, अशी धमकी देण्यात आल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. नवनीत राणा यांनी त्या व्यक्तीने फोनवरून शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याने आता नवी दिल्लीत तक्रार दाखल केली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in