ऋषिकेशमधील अपघातातील मृतांची संख्या ६ वर

सदर अपघातात वाहन प्रथम झाडाला धडकले वन नंतर ते नाल्याच्या भिंतीवर आदळले गेले होते.
ऋषिकेशमधील अपघातातील  मृतांची संख्या ६ वर

डेहराडून : ऋषिकेशमधील चिल्ला कालव्याजवळ झालेल्या एका वाहन अपघातातील मृतांची संख्या सहा झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या वनविभागाने ८ जानेवारीला एक विद्युत वाहन झाडाला धडकलेल्या स्थितीत मिळाले, ते ताब्यात घेतले. तेव्हा त्यात अंकुश श्रीवास्तव हा कानपूर येथील विद्युत वाहन निर्मिती कारखान्यात काम करणारा इसम मिळला. त्याचा सोमवारी ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात मृत्यू धाला. या अपघातात पाच जण घटनास्थाळी मरण पावले होते. त्यात तीन वन विभागाचे कर्मचारी होते, असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर अपघातात वाहन प्रथम झाडाला धडकले वन नंतर ते नाल्याच्या भिंतीवर आदळले गेले होते. या अपघातात वनक्षेत्रपाल शाहीलेश घिलडियाल, डेप्युटी रेंजर प्रमोद ध्यानी, सैफ अली खान आणि कुलराज सिंह यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुर्घटनेनंतर चिल्ला कालव्यात पडलेल्या राजाजी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव वॉर्डन आलोकी देवीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी सापडला होता. उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उनियाल यांनी अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in