कोचीत ख्रिश्चनांच्या समारंभातील स्फोटातील मृतांची संख्या ५ वर

२९ ऑक्टोबर रोजी यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिश्चन पंथाच्या धार्मिक मेळाव्यात हा स्फोट झाला होता.
 कोचीत ख्रिश्चनांच्या समारंभातील स्फोटातील मृतांची संख्या ५ वर

कोची - दोन आठवड्यांपूर्वी ख्रिश्चन धर्मीयांच्या एका धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या पाचवर गेली आहे, असे केरळ सरकारच्या वतीने सांगण्यात आले. सध्या या स्फोटात जखमी झालेल्या १७ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, असे या घटनेत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाच्या निवेदनात म्हटले आहे.

त्यापैकी आठ जण आयसीयूमध्ये असून एकाची प्रकृती गंभीर आहे, तर उर्वरित नऊ वॉर्डमध्ये उपचारासाठी आहेत. २९ ऑक्टोबर रोजी यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिश्चन पंथाच्या धार्मिक मेळाव्यात हा स्फोट झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in