३ डिसेंबर, काँग्रेस छू मंतर! भरतपूर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांचा आरोप

भरतपूर येथील एका सभेला संबोधित करताना मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना टोला लगावला.
३ डिसेंबर, काँग्रेस छू मंतर! भरतपूर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांचा आरोप

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आणि आरोप केला की, पक्षाने आपल्या तुष्टीकरणाच्या धोरणाने समाजकंटकांना सोडवून गुन्ह्यांमध्ये आणि दंगलींमध्ये राज्याला आघाडीवर पाठवले आहे.'३ डिसेंबर, काँग्रेस छू मंतर’, असा नाराही त्यांनी दिला.

भरतपूर येथील एका सभेला संबोधित करताना मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना टोला लगावला. अशोक गेहलोत यांचे वडील व्यावसायिक जादूगर होते आणि त्यांच्याबरोबर अशोक गेहलोत यांनी देशभरात फिरून जादूचे प्रयोग केले होते. त्याचा संदर्भ घेत मोदी यांनी म्हटले की, लोकांनी जादूगाराला मत न देण्याचा निर्णय घेतला आहे आणि निवडणुकीनंतर काँग्रेस राज्यातून नाहीशी होईल.

काँग्रेस पक्षाने तुष्टीकरणाच्या धोरणाने गुन्हेगारांना मोकळे हात दिल्याचा आरोपही त्यांनी केला. जेथे काँग्रेस येते, तिथे दहशतवादी, गुन्हेगार आणि दंगलखोरांना मोकळे सोडले जाते. तुष्टीकरण हे काँग्रेससाठी सर्व काही आहे. तुष्टीकरणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते. काँग्रेसच्या पाच वर्षांच्या राजवटीत राज्यात महिला आणि दलितांविरोधात सर्वाधिक गुन्हे घडले आहेत, अशी टीका मोदी यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in