महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर निर्णय घेऊ-सरन्यायाधीशांचे आश्वासन 

याचिकेला तातडीच्या यादीत घेऊन त्यावर सुनावणी करू, असे आश्वासन सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी मोईत्रा यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना बुधवारी दिले.
महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर निर्णय
घेऊ-सरन्यायाधीशांचे आश्वासन 

नवी दिल्ली  : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या हकालपट्टीला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  त्यांच्या याचिकेला तातडीच्या यादीत घेऊन त्यावर सुनावणी करू, असे आश्वासन सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी मोईत्रा यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना बुधवारी दिले.

मोईत्रा यांना दोषी ठरवणारा अहवाल लोकसभेत स्वीकारल्यानंतर मोईत्रा यांनी सोमवारी हकालपट्टीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सीजेआयच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने बुधवारी मोईत्रा यांचे वकील अभिषेक सिंघवी यांच्या याचिकेची दखल घेत सांगितले की, ते दिवसभरात संबंधित याचिकेच्या पैलूकडे लक्ष देतील.’ सिंघवी म्हणाले, ‘या सदस्याची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.’ त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, ‘हे प्रकरण नोंदवले गेले नसावे... जर ईमेल पाठवला गेला असेल, तर मी लगेच बघेन. कृपया ते पाठवा.’ आदल्या दिवशी, सिंघवी यांनी मोईत्रा यांच्या याचिकेचा उल्लेख ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एस. के. कौल यांच्या पुढे केला. त्यावेळी कौल यांनी सिंघवी यांना सांगितले की, सरन्यायाधीश या संबंधात विचार करतील.

logo
marathi.freepressjournal.in