महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय;पक्ष चिन्हाबाबत तूर्तास निर्णय नाही

सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच धनुष्यबाण चिन्ह राहणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय;पक्ष चिन्हाबाबत तूर्तास निर्णय नाही

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षामुळे निर्माण झालेल्या घटनात्मक पेचाबाबतची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याचा सोमवारी निर्णय घेण्यात येईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच शिंदे गटाने आमचा गट हीच खरी शिवसेना असून आम्हालाच पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह द्यावे, यासाठी केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने तूर्त निर्णय घेऊ नये, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच धनुष्यबाण चिन्ह राहणार आहे. शिंदे गटाच्या याचिकेवर आयोगाने दिलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने वेळ मागितल्यास त्यांच्या विनंतीचा विचार करण्यात यावा व त्यांना पुरेसा अवधी द्यावा, अशी सूचनाही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in