सिमेंटसारख्या क्षेत्रांना मे मध्ये केलेल्या कोळसापुरवठ्यात घट

सिमेंटसारख्या क्षेत्रांना मे मध्ये केलेल्या कोळसापुरवठ्यात घट

Published on

केंद्र सरकारच्या कोल इंडिया लि.कडून कॅप्टिव्ह पॉवर प्लॅन्टस‌् (सीपीपी) आणि सिमेंटसारख्या क्षेत्रांना मागील वर्षी मे महिन्याच्या तुलनेत यंदा मेमध्ये केलेल्या कोळसापुरवठ्यात घट झाली आहे. ‘सीपीपी’ला मे २०२२मध्ये केलेल्या कोळसा पुरवठ्यात गतवर्षीच्या वरील महिन्याच्या तुलनेत ३९.७४ टक्के तर सिमेंट क्षेत्राला होणाऱ्या पुरवठ्यात १६.७४ टक्के घट झाल्याचे सरकारची ताजी आकडेवारी सांगते.

कोल इंडियाकडून स्पॉन्ज क्षेत्राला कोळसा पुरवठा मेमध्ये मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ८.७४ टक्के कमी झाला आहे. तथापि, स्टील क्षेत्राला कोळसा पुरवठा यंदा मे मध्ये २०२१च्या मेच्या तुलनेत अनुक्रमे ६७.८३ टक्के आणि पॉवर क्षेत्राला १९.४८ टक्के कमी झाला आहे.

कोळशाचा अपुरा पुरवठा होत असल्याने वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जादा दर देऊन विजेची खरेदी करावी लागत असल्याने अनियंत्रित क्षेत्रातील उद्योग संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करावा, असे साकडे घातले होते.

logo
marathi.freepressjournal.in