डीपफेकमुळे समाजात अराजक माजेल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिंता

याविषयी माध्यमांनी जागरूकता करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
डीपफेकमुळे समाजात अराजक माजेल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिंता

नवी दिल्ली : डीपफेकमुळे समाजात अराजकता निर्माण होईल. हे डीपफेक तंत्रज्ञान धोकादायक आहे. याविषयी माध्यमांनी जागरूकता करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. भाजप मुख्यालयात आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, एका व्हिडीओत मला गरबा गीत गाताना दाखवण्यात आले आहे. असे अनेक ऑनलाईन व्हिडीओ आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कशी काम करते, हे समजणे गरजेचे आहे. कारण याचा दुरुपयोग चुकीची माहिती देण्यासाठी केला जाऊ शकतो. मीडियाने एआयच्या नकारात्मक बाबींबाबत जनतेला जागरूक करावे. त्यामुळे चुकीची व नुकसान करणारी माहिती उघड होणार नाही.

डीपफेक म्हणजे काय?

आजकालच्या डिजिटल काळात अनेक वेळा चुकीच्या बातम्या व खोटी माहिती इंटरनेटच्या मदतीने जनतेपर्यंत पोहोचवली जाते. याच पद्धतीने व्हिडीओही पाठवले जातात. याला डीपफेक म्हणतात. यात खऱ्या व खोट्याची शहानिशा करणे कठीण असते. यात एआय व मशीन लर्निंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

एक लाख दंड, तीन वर्षांची शिक्षा

डीपफेक बनवणाऱ्यांना व पसरवणाऱ्यांना एक लाख रुपये दंड व तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in