घटना व लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव आवश्यक; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांचे प्रतिपादन

धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर आक्रमण झाले असून घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव करणे आवश्यक आहे. यासाठीच...
घटना व लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव आवश्यक; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर आक्रमण झाले असून घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव करणे आवश्यक आहे. यासाठीच २०२४ च्या लोकसभा निवडणुका भारताच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी एका मुलाखतीत केले.

राम मंदिराच्या अभिषेकचा आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर निर्णायक प्रभाव पडेल या विधानाला वा अटकळीला त्यांनी नकार दिला. त्या संबंधात ते म्हणाले की, ‘रामा’बद्दल भाजपची समज लोकांच्या प्रभूबद्दलच्या समजापेक्षा वेगळी आहे. त्यांनी भाजपच्या ‘मोदी की हमी’ घोषणेला निवडणुकांपूर्वी निवडणुकीच्या फायद्यासाठी तयार केलेली एक घोषणा म्हणून फेटाळून लावले आणि त्याला त्यांनी एक ‘जुमला’ म्हणून संबोधले.

नोकऱ्यांबाबत, काळा पैसा परत आणण्यात आणि महागाईवर मात करण्यात पंतप्रधान मोदी अपयशी ठरले आहेत, असे ते म्हणाले. २०२४ च्या निवडणुका देशासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी अतिशय गंभीर आहेत. गेल्या १० वर्षांपासून आपण जे पाहिले ते एक विनाशकारी शासन आहे. श्रीमान मोदींनी जास्तीत जास्त प्रशासन, किमान सरकारचा दावा केला, परंतु प्रशासन किमान, अगदी वजाही झाले आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. संसद निरर्थक होत आहे, असे ते म्हणाले.

गेल्या हिवाळी अधिवेशनात संसदेतून १४० हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले हे अभूतपूर्व आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in