रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे व्हिडीओ हटवा; रेल्वेची ‘एक्स’ला नोटीस

येथील रेल्वे स्थानकावर १५ फेब्रुवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता.
रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे व्हिडीओ हटवा; रेल्वेची ‘एक्स’ला नोटीस
पीटीआय
Published on

नवी दिल्ली : येथील रेल्वे स्थानकावर १५ फेब्रुवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीचे २८८ व्हिडीओ लिंक हटवण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने ‘एक्स’ला दिले आहेत. रेल्वे खात्याने १७ फेब्रुवारीला याबाबत नोटीस दिली असून, हे व्हिडीओ हटवायला ३६ तासांची मुदत दिली आहे.

खात्याने आपल्या नोटिशीत म्हटलेय की, नैतिकतेबरोबरच ‘एक्स’च्या मजकूर धोरणाविरोधातq हे आहे. या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती खराब होऊ शकते. रेल्वेतील गर्दी पाहता रेल्वेच्या परिचलनावर प्रभाव पडू शकतो, असे नोटिसीत नमूद केले आहे.

व्हिडीओ हटवण्याचा अधिकार डिसेंबरमध्ये मिळाला

रेल्वे मंत्रालयाला डिसेंबरमध्ये व्हिडीओ हटवण्याचे अधिकार मिळाले. त्यानंतर रेल्वे खात्याने ही मोठी कारवाई केली आहे. रेल्वेने कार्यकारी संचालकाला २४ डिसेंबर रोजी खास अधिकार दिला. त्यात सोशल मीडिया व्यासपीठावरील कोणतीही माहिती थेट हटवण्याचे आदेश देण्याचे अधिकार दिले. जानेवारीत रेल्वे खात्याने यूट्यूब व इन्स्टाग्रामला अशाच प्रकारची नोटीस पाठवली होती, ज्यात वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in