Delhi Accident Video : चालकाचा गाडीवरचा तोल सुटला आणि...

दिल्लीमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि ते बघितल्यावर तुमच्या काळजाचा थरकाप उडेल
Delhi Accident Video : चालकाचा गाडीवरचा तोल सुटला आणि...

रविवारी सकाळी दिल्लीतील गुलाबी बागमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक भरधाव गाडी फुटपाथवर चढली. या अपघातात ३ मुले गाडीखाली आली. या अपघातात २ मुलांना किरकोळ दुखापत झाली, पण एका मुलाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान घडली असून यासंबंधित एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अपघात घडला तेव्हा लगेचच स्थानिक लोकांनी मुलांच्या मदतीसाठी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गुलाबी बाग परिसरात एका वेगवान गाडीने ३ मुलांना धडक दिली. यामध्ये २ मुलांना किरकोळ दुखापत झाली असून तिसऱ्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गाडीवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in