कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता दिल्लीत उपोषण

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यातील वाद राज्याला सर्वश्रुत आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता दिल्लीत उपोषण

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गुंडाकडून मला मारहाण झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार करूनही मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असून दिल्लीत उपोषणाला बसणार आहे. अशी माहिती करुणा मुंडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यातील वाद राज्याला सर्वश्रुत आहे. त्यातच करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केलेत. मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून माझ्यावर ६ खोट्या केसेस केल्या, माझ्या गाडीवर हल्ला केला. मी पोलीस संरक्षण मागूनही पोलीस संरक्षण दिले जात नाही. रेणू शर्माने त्यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार केली मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.उलट राजकीय ताकदीचा वापर करून तिला तुरुंगात टाकण्यात आले. अशी स्थिती राज्यात आहे.

दोन महिन्यांपूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी गेले असता, मुंडे यांच्या गुंडाकडून मला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण करण्यात आली.मी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागूनही मला देण्यात आले नाही. धनंजय मुंडे यांच्यासारखा दोन लग्न करून ५ मुलांना जन्म देणारा आणि बायकोच्या गाडीत रिव्हॉल्व्हर ठेवणाऱ्याची आमदारकी रद्द का करण्यात येत नाही.असा सवाल ही मुंडे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in