Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान; भाजप, आप व काँग्रेस यांच्यात टक्कर

सलग दोन टर्म बहुमताने आम आदमी पार्टीने देशाच्या राजधानीच्या किल्ल्या आपल्याकडे राखल्यानंतर अलीकडेच जेलची हवा खाल्लेले अरविंद केजरीवाल यांच्या ‘झाडू’चा करिश्मा नवी दिल्लीत पुन्हा दिसणार का, याकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान; भाजप, आप व काँग्रेस यांच्यात टक्कर
एएनआय
Published on

नवी दिल्ली : सलग दोन टर्म बहुमताने आम आदमी पार्टीने देशाच्या राजधानीच्या किल्ल्या आपल्याकडे राखल्यानंतर अलीकडेच जेलची हवा खाल्लेले अरविंद केजरीवाल यांच्या ‘झाडू’चा करिश्मा नवी दिल्लीत पुन्हा दिसणार का, याकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले आहे. नवी दिल्लीत बुधवारी विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होणार असून केजरीवाल हॅटट्रिक करण्यासाठी उत्सुक आहेत. यावेळी मात्र ‘आप’ला काँग्रेस आणि भाजपचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे.

दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांवर बुधवारी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी निमलष्करी दलाच्या २२० तुकड्या, १९,००० होमगार्ड आणि ३५,६२६ दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. याव्यतिरिक्त, २१,५०० हून अधिक मतपत्रिका युनिट्स आणि व्हीव्हीपॅट तयार करण्यात आले आहेत.

भाजप, आप व काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर

तब्बल ७० जागांवर भाजप, ‘आप’ आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे. भाजपने ६८ जागांवर आपले उमेदवार उतरवले असून उर्वरित दोन जागा जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) या दोन मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in