बिगुल वाजलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला, ८ तारखेला मतमोजणी

दिल्लीतील एकूण ७० विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परीषदेत जाहीर केले. यावेळीही दिल्लीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
बिगुल वाजलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला, ८ तारखेला मतमोजणी
Published on

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि.७) निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. दिल्लीतील एकूण ७० विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परीषदेत जाहीर केले. बघूया दिल्ली विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक -

एकाच टप्प्यात निवडणूक -

दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल, तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडेल. निवडणुकीची अधिसूचना १० जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी असेल. १८ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २० जानेवारी असेल.

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी २०२५ रोजी संपत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार १८ फेब्रुवारी २०२५ रोजी निवृत्त होत आहेत, त्यापूर्वीच दिल्ली विधानसभेची निवडणूक होत आहे. यावेळीही दिल्लीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी सोमवारी निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर केली होती. यावेळी दिल्लीत एकूण १ कोटी ५५ लाख २४ हजार ८५८ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, यावेळी दिल्ली निवडणुकीत एकूण १.५५ कोटींहून अधिक मतदार असतील. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८३,४९,६४५ आहे, तर महिला मतदारांची संख्या ७१,७३,९५२ आहे. तर तृतीयपंथीयांची संख्या १,२६१ आहे.

logo
marathi.freepressjournal.in