दिल्लीत इमारत कोसळून ६ ठार, १० जखमी; वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश

दिल्लीतील साकेत परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे, तर जखमींपैकी १० जणांवर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या प्रकरणी दोन अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दिल्लीत इमारत कोसळून ६ ठार, १० जखमी; वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश
दिल्लीत इमारत कोसळून ६ ठार, १० जखमी; वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील साकेत परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे, तर जखमींपैकी १० जणांवर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या प्रकरणी दोन अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कोसळलेली इमारत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या कॅन्टीनसाठी वापरली जात होती. त्यामुळे दुर्घटनेवेळी अनेक विद्यार्थी इमारतीत उपस्थित होते. अपघातानंतर काही विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. यात परदेशी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तयारी करणारे विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.

एनडीआरएफ, अग्निशमन दल, डीडीएमए आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे बचावकार्य हाती घेतले. जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला. घटनेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली. अनधिकृत बांधकामांना परवानगी देणारे अधिकारी आणि बेकायदेशीर बांधकामात सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी सांगितले की, शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दिल्लीत इमारत कोसळण्याच्या घटना वाढल्या

दिल्लीच्या मुस्तफाबाद परिसरात एप्रिल २०२५ मध्ये चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये वेलकम भागात चार मजली इमारत कोसळल्याने सहा जणांचा जीव गेला होता. आता साकेतमधील दुर्घटनेनंतर राजधानीतील जुन्या आणि अनधिकृत बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in