दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी घेतली PM मोदींची भेट; सोशल मीडिया पोस्टवर म्हणाल्या, दिल्लीकरांच्या स्वप्नांना...

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज शनिवारी (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी घेतली PM मोदींची भेट
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी घेतली PM मोदींची भेटX - @gupta_rekha
Published on

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज शनिवारी (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली, भाजपचे डबल इंजिन सरकार, जन कल्याण आणि सुशासनाच्या मार्गावर चालत दिल्लीकरांच्या स्वप्नांना विकसित दिल्लीत रुपांतरीत करण्यासाठी वचनबद्ध आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना होण्यापूर्वी, रेखा गुप्ता यांनी त्यांच्या शालीमार बाग येथील निवासस्थानाच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून त्यांच्या शुभचिंतकांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, "कार्यकाळातील पहिल्याच दिवशी, आम्ही पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींच्या 'आयुष्मान भारत योजने'ला मंजुरी दिली. आमचे ध्येय पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आदेशानुसार विकसित दिल्ली साध्य करणे आहे. विकसित दिल्लीचा प्रवास आपण सर्वांनी मिळून पूर्ण केला पाहिजे," असे 'आयएएनएस' ने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे.

२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (आप) पराभव करून भाजपने जवळजवळ २७ दशकांनंतर दिल्लीत ऐतिहासिक पुनरागमन केले. गुप्ता यांनी शालीमार बाग मतदारसंघातून आपच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in