
दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सिटी कोर्टामध्ये हजर केले होते. यावेळी सीबीआयने त्यांची ५ दिवसांची कोठडी मागितली. त्यावर न्यायालयाने सिसोदियांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. यामुळे आता त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज मनीष सिसोदियांना सीबीआयने न्यायालयात हजर केले होते. यावेळी सीबीआयने युक्तिवाद केला की, मनीष सिसोदियांनी चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. म्हणून त्यांना अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने रविवारी त्यांना अटक केली होती. दिल्लीत उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही मद्य उत्पादकांसाठी नियमावली लीक करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदियांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून १०० कोटींची लाच घेतल्याचा दावा सीबीआयने केला.