मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत बहुमत मिळवल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सरकार स्थापनेकडे लागले आहे.
मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार
एक्स @AdityaRajKaul
Published on

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत बहुमत मिळवल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सरकार स्थापनेकडे लागले आहे. तसेच मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर म्हणजे १३ फेब्रुवारीनंतर दिल्लीतील भाजपचा मुख्यमंत्री ठरणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये अनेक नावे चर्चेत आहेत.

भाजप नेत्यांच्या माहितीनुसार, मोदी अमेरिकेवरून परतल्यानंतर भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकते. भाजपमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री निश्चित करण्याबाबत विचारविमर्ष सुरू झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबाबत चर्चा केली. तर दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली आहे.

नायब राज्यपालांकडे वेळ मागितली

दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी नायब राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर सचदेवा म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षाचे नेतृत्व घेईल. सर्व निवडून आलेले आमदार हे त्यांची जबाबदारी पार पाडायला सक्षम आहेत.

logo
marathi.freepressjournal.in