Delhi Election 2025 Result Live Updates: केजरीवाल, आतिशी, सिसोदिया; पाहा दिल्लीच्या Hot Seats चे ताजे अपडेट
Delhi Election 2025 Result Live Updates: केजरीवाल, आतिशी, सिसोदिया; पाहा दिल्लीच्या Hot Seats चे ताजे अपडेटसोशल मीडिया

Delhi Election 2025 Result Live Updates: केजरीवाल, आतिशी, सिसोदिया; पाहा दिल्लीच्या Hot Seats चे संपूर्ण अपडेट

दिल्ली विधानसभा 2025 निवडणुकीचे आज निकाल आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. बघा दिल्लीतील Hot Seats चे अपडेट आणि डिटेल्स.

कोणाचा किती मतांनी पराभव?

Summary

नवी दिल्ली येथून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या प्रवेश सिंग (वर्मा) यांनी ४०८९ मतांनी पराभव केला आहे. प्रवेश सिंग (वर्मा) यांना ३००८८ मते मिळाली. तर केजरीवाल यांना २५९९९ मते मिळाली. तर काँग्रेसचे संदीप दिक्षित यांना ४५६८ मते मिळाली ते तिसऱ्या स्थानावर राहिले. जंगपूरा येथून भाजपचे तरविंदर सिंह मारवाह यांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा ६७५ मतांनी पराभव केला. तरविंदर सिंह मारवाह यांना ३८८५९ तर मनिष सिसोदिया यांना ३८१८४ मते मिळाली. काँग्रेसचे फरहद सुरी यांना ७३५० मते मिळाली आहेत. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे रमेश बिधुरी यांचा ३५२१ मतांनी पराभव केला आहे. आतिशी यांना ५२१५४ मते मिळाली. तर रमेश बिदुरी यांना ४८१३४ मते मिळाली. तर काँग्रेसच्या अल्का लांबा यांना ४३९२ मते मिळाली. त्या तिसऱ्या स्थानावर राहिल्या.

केजरीवाल-सिसोदियांचा पराभव, आतिशी यांचा निसटता विजय 

Summary

दिल्ली निवडणुकांचे निकाल येण्यास आता सुरूवात झाली असून आम आदमी पक्षाला मोठा झटका बसलाय. पक्षाचे दोन मोठे नेते अर्थात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया या दोघांचाही पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या प्रवेश सिंग (वर्मा) यांच्याकडून केजरीवाल यांना तर जंगपूरा मतदारसंघातून मनिष सिसोदिया यांना तरविंदर सिंह मारवाह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर, कालकाजी मतदारसंघातून भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव करत आतिशी यांनी निसटता विजय मिळवला आहे. अद्याप मतांची नेमकी आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.

केजरीवाल पुन्हा पिछाडीवर   (दु.१२ पर्यंतची आकडेवारी) 

Summary

निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार नवी दिल्ली सीटवर भाजपचे प्रवेश सिंग (वर्मा) हे आघाडीवर आहेत. त्यांनी ११७० मतांची आघाडी घेतली असून १९,२६७ मतं मिळाली आहेत. तर, अरविंद केजरीवाल यांना १८०९७ आणि संदीप दिक्षीत यांना ३११३ मतं पडली आहेत. दिक्षीत तब्बल १६१५४ मतांनी पिछाडीवर आहेत.

सिसोदिया आणि तरविंदर सिंह यांच्यात अटीतटीची लढत (दु.१२ पर्यंतची आकडेवारी)

Summary

जंगपुरा मतदारसंघात मनिष सिसोदिया आणि तरविंदर सिंह मारवाह यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. दुपारी १२ वाजता निवडणूक आयोगाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार भाजपचे तरविंदर सिंह मारवाह हे २४० मतांनी आघाडीवर असून त्यांना २६३७९ मते पडली आहेत. तर सिसोदिया यांना २६१३९ मते पडली आहेत.

जंगपुरा मतदारसंघात सिसोदिया आणि तरविंदर सिंह यांच्यात अटीतटीची लढत
जंगपुरा मतदारसंघात सिसोदिया आणि तरविंदर सिंह यांच्यात अटीतटीची लढतनिवडणूक आयोग संकेतस्थळ

मुख्यमंत्री आतिशी यांचा पाय खोलात? (दु.१२ पर्यंतची आकडेवारी)

Summary

निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, कालकाजी मतदारसंघातून भाजपचे रमेश बिधुरी यांनी ३२३१ मतांची आघाडी घेतली असून त्यांना २५७९२ मते मिळाली आहेत. मुख्यमंत्री आतिशी यांना २२५६१ मते तर अल्का लांबा यांना २३२८ मते पडली आहेत. त्या २३४६४ मतांनी पिछाडीवर आहेत.

कालकाजी मतदारसंघातून भाजपचे रमेश बिधुरी आघाडीवर; मुख्यमंत्री आतिशी यांची पिछाडी
कालकाजी मतदारसंघातून भाजपचे रमेश बिधुरी आघाडीवर; मुख्यमंत्री आतिशी यांची पिछाडीनिवडणूक आयोग संकेतस्थळ

नवी दिल्ली सीटवर अटीतटीची लढत, केजरीवाल पिछाडीवर (स. ११ पर्यंतची आकडेवारी)

Summary

नवी दिल्लीच्या सीटवर आपचे केजरीवाल आणि भाजपचे प्रवेश सिंग (वर्मा) यांच्यात अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ११ वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार केजरीवाल पुन्हा एकदा पिछाडीवर गेले आहेत. परवेश शर्मा २२५ मतांनी आघाडीवर आहेत. सिंग यांना १२,३८८ मतं, केजरीवाल यांना १२,६१३ मतं आणि काँग्रेसच्या संदीप दिक्षीत यांना अवघी २०५० मतं मिळाली असून ते तब्बल १० हजार ३३८ मतांनी पिछाडीवर आहेत.

कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर (स. ११ पर्यंतची आकडेवारी)

Summary

ट्रेंडमध्ये, कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर आहेत. कालकाजी जागा ही सर्वात चर्चेत असलेल्या जागांपैकी एक आहे. येथे आपच्या आतिशी, काँग्रेसच्या अलका लांबा आणि भाजपचे रमेश बिधुरी यांच्यात टक्कर आहे. सकाळी ११ पर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील अपडेटनुसार, भाजपचे बिधुरी २१,५१९ मतं मिळवून आतिशी यांच्यापेक्षा २८०० मतांनी आघाडीवर आहेत. आतिशी यांना १८,७१९ मतं तर अलका लांबा यांना केवळ १८६४ मतं पडली आहेत.

मनिष सिसोदिया पुढे (स. ११ पर्यंतची आकडेवारी)

Summary

आप नेते मनिष सिसोदिया हे २०२५ च्या निवडणुकीत जंगपुरा येथून लढत आहे. त्यामुळे या जागेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार सिसोदिया यांनी भाजपच्या तरविंदर सिंह मारवाह यांना २६८६ मतांनी मागे सोडले आहे. सिसोदिया यांना ११,२६१ मतं मिळाली आहेत. तर, मारवाह यांना ८५७५ मतं आणि काँग्रेसच्या फरहाद सुरी यांना ४२०२ मतं मिळाली आहेत.  

logo
marathi.freepressjournal.in