दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने रविवार कठोर निर्णय घेतले होते. यात मुख्यता शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता दिल्लीतील केजरीवाल सरकारने आणखी काही कठोर निर्णय घेतले आहेत. दिल्ली सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितलं की, दिल्लीत एका आठवड्यासाठी ऑड इव्हन लागू असेल. तसंच दिवाळीनंतर १३ तारखेपारसून पुन्हा ऑड इव्हन लागू करण्यात येणार आहे. यात २० तारखेपर्यंत १० वी आणि १२वीचे वर्ग सोडून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
याच सोबत सरकारने दिल्लीतील सगळ्या बांधकामानंना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच BS4 डिझेलच्या वाहनांना रस्त्यावर येण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितलं.