ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांना दिल्ली कोर्टात उपस्थित राहण्याची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे समन्स बजावले
ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांना दिल्ली कोर्टात उपस्थित राहण्याची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. ज्या आमदार खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. त्या आमदार, खासदारांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह्य विधाने केली असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलेला आहे. या मानहानी प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज याचिका दाखल करुन घेतली. त्यानंतर संजय राऊत यांच्यासह ठाकरे पिता पुत्रांना समन्स बजावले आहे. तसेच, न्यायालयाने तिघांनाही याप्रकरणी प्रत्यक्षपणे न्यायालयामध्ये हजर राहून आपली बाजू मांडावी, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in